आमच्या विषयी

आमच्या विषयी

राजलक्ष्मी द्वारे आपली स्वप्ने समजून घेतो

राजलक्ष्मी मल्टीस्टेट सोसायटी महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र स्थित सहकारी चळवळ आहे. तिची स्थापना 2 जून 2000 रोजी रू. 29700 इतक्या छोट्याशा भांडवलाद्वारे झाली. प्रारंभी मध्यमवर्गीयांचे – दूस-या इनिंगचे खेळाडू, आस्थापन आता महाराष्ट्रातील यवतमाळ आणि आसपासच्या उपनगरातील हजारो जनतेचा चिरकालीन श्वास बनले आहे. “सहकार अपयशी ठरला आहे –सहकार चिरायु होवो” हा सहकार चळवळीचा नारा या संस्थेने पूर्णपणे पुसून टाकला आणि अवघ्या दहा वर्षांत जवळच्या आंध्र प्रदेश राज्यात प्रवेश करून बहुराज्य आस्थापन अशी आपली ओळख तयार केली आहे. राजलक्ष्मी तिच्या गुणवत्ता व्यवस्थापन व्यवस्थेसाठी आता आतरराष्ट्रीय गुणवत्ता संघटनेद्वारे प्रमाणित ISO 9001 – 2008 संस्था आहे. आमच्या बहुराज्य संस्थेने “कोअर बॅंकिंग तंत्रज्ञान” यांस प्राधान्य दिले आहे आणि त्याची अंमलबजावणी केली आहे, जी आमच्या ग्राहकांना आमच्या कोणत्याही शाखेत शीघ्र, गुणवत्तापूर्ण आणि अचूक सेवा प्रदान करण्यात साहाय्य करते.

श्री. अरविंद तायडे, संस्थेचे संस्थापक चेअरमन, यवतमाळमध्ये अशा प्रकारची सहकारी पतसंस्था सुरू करणारे अग्रदूत आहेत. त्यांच्या सततच्या परिश्रमांमुळे संस्था वर्तमान स्थितीत उभी आहे. समाजामधील गरीब वर्गाच्या कष्टांची जाणीव त्यांना आहे. स्वयंसाहाय्यासाठी प्रवृत्त करण्याच्या प्रभावामुळे त्यांनी गोरगरीबांच्या आर्थिक प्रगतीसाठी परिश्रम घेतले आहेत. छोटी कर्जे, परतफेडीचे सोपे वेळापत्रक ही संस्थेची संस्कृती आहे. त्यामुळेच, संस्थेने महाराष्ट्र प्रदेशाच्या ह्रदयाच्या क्षितिजावर आपली पकड मजबूत केली आहे. 

सामाजिक बांधिलकी

आर्थिक क्षेत्रात काम करीत असतांना संस्थेने समाजाशी आपल्या नात्याचे बंध कायम राखले आहेत. संस्थेने सर्व धर्मियांसाठी विवाह समारंभ, वनीकरण, घटना एकत्रीकरण, रक्तदान, सामाजिक प्रबोधनहेतु “कीर्तन महोत्सव”, पल्स-पोलिओ केंद्र, विविध क्रीडा स्पर्धा, आर्ट ऑफ लिविंग, आरोग्य शिबीरे, “पातंजली योगपीठ” द्वारे कायमस्वरूपी योग प्रशिक्षण, समता-चॅप्टर, गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गौरव, सामाजिक बांधिलकीतून कन्या-भ्रूण हत्या विरूद्ध प्रबोधन, आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, पूरग्रस्तांना तातडीची मदत, साहित्य प्रकाशन, महिला संस्थांना प्रोत्साहनपर पुरस्कार, सामान्य ज्ञान-निबंध स्पर्धा, इत्यादी समाजोपकारक कार्यक्रमांचे आयोजन करून आजची पिढी आणि समाज यांच्या संवर्धनासाठी योगदान दिले आहे. मृत व्यक्तिंच्या कुटुबियांप्रती आपली संवेदना व्यक्त करण्याच्या उद्देशाने संस्थेने आपल्या फंडातून शववाहिनी पुरस्कृत केली आहे. 

रेनवॉटर हारवेस्टींग:

यामध्ये पावसाचे पाणी प्रक्रिया करण्यासाठी भूगर्भात पोचण्यापूर्वी संचयित करून साठवले जाते. त्याच्या उपयोग पिण्याचे पाणी, उदरनिर्वाहासाठी पाणी, शेतीच्या कामांसाठी पाणी, तसेच अन्य नमुनेदार उपयोगांसाठी करण्यात येतो. घरांच्या छप्परांवरून आणि मर्यादित संस्थांकडून गोळा केलेले पावसाचे पाणी पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते.

संचालकाचे नावपद
सौ. संध्या अरविंद तायडे अध्यक्ष
श्री घनश्याम फकीरजी चिरडे उपाध्यक्ष
श्री अरविंद वामनराम तायडेसंचालक
श्री प्रशांत विठ्लराव व्यवहारेसंचालक
श्री वसंत मारोती पांडेसंचालक
श्री महादेव कोंडबाजी खरतडे संचालक
श्री चंद्रकांत कृष्णराव तायडे संचालक
श्री प्रकाश केशवराव सराफ संचालक
श्री विलास विठ्ठलराव मनमोडे संचालक
श्री सखाराम दिगंबरराव सावनकर संचालक
श्री भूषण वामनराव म्हैसेकर संचालक
श्री नितीन दिनकरराव भगवते संचालक
श्री मोहम्मद लूकमन मोहम्मद सुलतान संचालक
श्री अभय विश्वनाथ अलमेळकर संचालक
सौ मंजुषाताई विजयराव पोटेसंचालक
सौ वनिता ज्ञानेश्वर सुरजुषे संचालक
श्री क्षितिज अरविंदराव तायडे व्यवस्थापकीय संचालक
वृत्त