NEFT AND RTGS

NEFT AND RTGS

NEFT:
NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंडस् टान्सफर. ती भारतामध्येच एका आर्थिक संस्थेतून दूस-या आर्थिक संस्थेत (सामान्यतः बॅंक) निधी हस्तांतरीत करण्याची ऑनलाइन व्यवस्था आहे. ही व्यवस्था नोव्हेंबर 2005 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि SEFT वटण्याची व्यवस्था असलेल्या सर्व बॅंकेने स्वीकारण्यायोग्य बनविण्यात आली. रिझर्व्ह बॅंकेद्वारे डिसेंबर 2005 च्या मध्यापर्यंत SEFT व्यवस्था असलेल्या सर्व बॅंकांनी NEFT कडे स्थलांतर करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. अशाप्रकारे जानेवारी 2006 पर्यंत SEFT अप्रचलित करण्यात आले.  RTGS च्या पूर्ण सभासद असलेल्या सर्व बॅंका NEFT व्यवस्थेशी सहभागी होण्याचे रिझर्व्ह बॅंकेने स्वागत केले आहे.

RTGS:
RTGS  म्हणजे रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट. RTGS ही रियल टाइम मध्ये आणि ठोक आधारे एका बॅंकेतून दूस-या बॅंकेत निधी हस्तांतरीत करण्याची व्यवस्था आहे. बॅंकेची पद्धत वापरत असतांना, RTGS हा पैसे हस्तांतरीत करण्याचा सर्वांत जलद मार्ग आहे. रियल टाइम म्हणजे रक्कम अदा करण्यासाठी कोणतीही प्रतिक्षा करायची गरज नाही. प्रक्रिया पूर्ण होताच व्यवहार पूर्ण होईल आणि कोणत्याही अधिक व्यवहाराशिवाय एकाच प्रविष्टीद्वारे पैसे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. ही प्रविष्टी अंतीम समजली जाईल आणि पैशांचे हस्तांतरण भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पुस्तिकेत समाविष्ट होईल. ही व्यवस्था रिझर्व्ह बॅंकेद्वारे व्यवस्थापित केली जाते आणि कामाच्या दिवसांत निर्धारित तासांसाठी उपलब्ध आहे.  RTGS वापरणा-या बॅंकांना RTGS व्यवहार करण्यासाठी कोअर बॅंकिंग असणे आवश्यक आहे.

लाभ:

लाभार्थीस रक्कम अदा करण्यासाठीच्या तारखेची खात्री.

  • डिमांड ड्राफ्ट आणि कुरिअर यांसाठीच्या खर्चात कपात.
  • कागद-आधारित साधनांशी संबंधित फसवेगिरीने रक्कम वटविण्यातील जोखमीत घट.
  • पुनर्संगतीसाठी व्यतीत होणा-या वेळेत घट.